मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जयसिंगपुरात

    जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (शुक्रवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्या दरम्यान सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते होत आहे, या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

    यानंतर जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियमच्या ठिकाणी भेट देणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता जयसिंगपूर नगरपरिषदेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.या जनसंवाद मेळाव्यास शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनसंवाद मेळाव्याचे संयोजक आमदार यड्रावकर यांनी केले आहे.