मुख्यमंत्री शिंदे यांचा पुन्हा थेट ठाकरेंवरच निशाणा; उद्धव ठाकरे गट उल्लेख

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातून सध्या विस्तव जात नाही. त्यातच न्यायालयात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंडखोरी केली. सुरुवातीला संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका करताना बंडखोरांनी ठाकरे कुटुंबाविषयी आदर असल्याचा दावा केला. मात्र, आता थेट ठाकरे कुटुंबालाच लक्ष्य (Thackeray Family Target) करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जन्मदिनाच्या सदिच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘माजी मुख्यमंत्री’ (Ex- Chief Minister) असा केला. आता राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल जाहीर झाल्यानंतर ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे.

    एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.