मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच ३० जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जात आहेत. ३० आणि ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री मालेगावसह संभाजीनगरचा दौरा करतील. दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री नाशिकऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार आहेत.

    मुंबई : आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिकमार्गे (Nashik) मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री १० वाजता मुख्यमंत्र्यांचे मालेगाव (Malegaon) शासकीय विश्रामगृहावर आगमन होणार असून रात्री येथेच त्यांच्या मुक्काम असणार आहे. ३० जुलै रोजी सकाळी १० पासून मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागाचा (Heavy Rainfall Area) दौरा करण्यास सुरुवात करतील.

    शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच ३० जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जात आहेत. ३० आणि ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री मालेगावसह संभाजीनगरचा (Sambhaji Nagar) दौरा करतील. दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री नाशिकऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार आहेत.

    शिवसेनेचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आधी संजय राऊत त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आदित्य त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत.