CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

  पुणे : ‘आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे’ यांचा स्मारक महायुतीच्या सरकारमध्ये होतंय याचा मला विशेष आनंद होतो. सरकारने राज्यातील स्मारकांसाठी, गड किल्ल्यांसाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी न्याय देणारा राज्याच्या अर्थसंकल्पाम मांडला आहे. भिडे वाड्याचेदेखील न्यायालयीन लढाई आमच्या सरकारने जिंकली त्याचे दिखील स्मारक होत आहे.
  आमचे सरकार पूर्ण प्रयत्न करतेय
  जगाला हेवा वाटावा असे स्मारके आम्ही करतोय. तुमच्या विचारांचे सरकार आल्याने आणि जुने सरकार घरी पाठवल्याने आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक होत आहे. त्यांच्या हातातील दांडपट्ट्यालादेखील आम्ही राज्यशस्त्राचा दर्जा दिला आहे. त्यासाठी आमच्या सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे.
  मातंग समाज हा अतिशय प्रेमळ कष्टाळू आणि दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही अण्णाभाऊ साठे यांचा देखील स्मारक करत आहोत त्यासाठी आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
  यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कोठरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, क्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आद्य क्रांतिक गुरुजी वस्ताद साळवे यांनी हजारो तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली. आजचा दिवस पुण्याचा दिवस आहे. कारण आज दोन पुण्याचे काम घडले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. छत्रपती दुसऱ्या मावळ्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले.
  लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. त्यांच्याकडे पुरंदर किल्ल्याची जबादरी महाराजांनी दिली होती. तसेच त्यांना राऊत पदवी दिली. लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतिकारकांना शस्त्रा सरांचे लढाईचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढणारे तरुण तयार केले. महिला शिक्षणाचे मुहूर्त मिळवणाऱ्या महात्मा फुले दांपत्यावर हल्ला केला जात असे, त्यामुळे त्यांना संरक्षण दिले. त्यानंतर फुलेंच्या वाटेला कोणी गेले नाही. साळवे यांनी देह ठेवेपर्यंत देश कार्य केले. अशा प्रेरकांच्या स्मारकासाठी आमच्या सरकारची गरज होती. ते संपूर्ण हिंदुस्तानचे आहेत. स्मारकाच्या उद्घाटन आम्ही नरेंद्र मोदीच्या हस्ते करू.’
  पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लहुजी वस्ताद साळवे यांनी त्या काळात दिशा देण्याचे काम केले. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचे पराक्रमी घराणे होते. त्यांनी इंग्रजी जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी लढणारे अनेक तरुण घडवले. व्यायाम, शिक्षणाने मेंदू बळकट करणं हे त्यांचे विचार तरुणांना घेतले पाहिजे. आमचे सरकार चांगले निर्णय घेत आहे. देशातील आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहून ४०० खासदार निवडून आणायचे आहेत हे लक्षात ठेवा असे आवाहनदेखील त्यांनी केले.
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत असतानाच प्रेक्षकातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशा घोषणा होऊ लागल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरीही या घोषणा सुरूच होत्या. अखेरीस शिंदे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो. मात्र घोषणा सुरूच होत्या. नंतर शिंदे म्हणाले आम्ही अण्णाभाऊ साठेंचा स्मारक भांधत आहोत, आमचं सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या मागणीच्या घोषणात प्रेक्षकातून येत होत्या.