devendra-fadnavis

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे, अशा प्रकारचे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नुकतेच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची देखील हीच इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटले आहे.

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे, अशा प्रकारचे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नुकतेच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची देखील हीच इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटले आहे.

    संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महेश तपासे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत आणि वेळोवेळी याची जाणीव ते मुख्यमंत्री शिंदेंना व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करून देतात. शिवसेनेतील आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या टांगत्या तलवारीचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे हे संजय शिरसाठ व मुख्यमंत्री शिंदे यांना माहीत आहे.

    त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे, अशी इच्छा त्यांनी प्रकट करण्यात आली. अर्थात ही सदिच्छा फडणवीस यांच्या प्रेमापोटी नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयातील कारभारामध्ये वाढत्या हस्तक्षेपामुळे केली असल्याचे तपासे म्हणाले.