‘पाकिस्तान घोषणाबाजी’वर कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

पाकिस्तान जिंदाबादची घोषणा जर कोणी महाराष्ट्रात अथवा भारतात देणार असेल तर त्याला सोडणार नाही. जिथे असेल तिथे शोधून कारवाई करू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

    मुंबई – पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलिस यंत्रणा त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत. असा कडक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएफआय’ घोषणाबाजी प्रकरणी दिला आहे.

    त्याचप्रमाणे पाकिस्तान जिंदाबादची घोषणा जर कोणी महाराष्ट्रात अथवा भारतात देणार असेल तर त्याला सोडणार नाही. जिथे असेल तिथे शोधून कारवाई करू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ‘पीएफआय’ आंदोलनात‘पाकिस्तान जिंदाबाद’आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

    ‘पीएफआय’विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी अनेकांना अटक करण्यात आली होती. भाजप आमदार नीतेश राणे आणि राम सातपुते यांनी ट्विट करत घोषणाबाजीचा आरोप केला. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.