Chief Minister Eknath Shinde will give a good cabinet to the state - Sanjay Gaikwad believes

आमचे सर्व चांगले वाईट निर्णय एकनाथ शिंदे घेतील तसेच एकनाथ शिंदे राज्याला चांगले मंत्रिमंडळ देतील, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच, सुप्रीम कोर्टामध्ये पांडुरंगाच्या कृपेने १०० टक्के निकाल हा आमच्या बाजूने असणार आहे, अशी ही प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी दिली.

    बुलढाणा : आषाढी एकादशी झाल्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सोबत भेटू आणि चर्चा करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) म्हणाले होते. आमचे सर्व चांगले वाईट निर्णय एकनाथ शिंदे घेतील तसेच एकनाथ शिंदे राज्याला चांगले मंत्रिमंडळ देतील, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे.

    तसेच ते पुढे म्हणाले की अध्यक्षाच्या निवडीबाबत जो व्हीप बजावून १६ आमदारांना डिस्क्वालीफाईड करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचा खरा गट आमच्याकडे होता. 2/3 मेजॉरिटी आमच्याकडे होती. त्याच्यामुळे तो सर्वस्वी अधिकार आमचा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पांडुरंगाच्या कृपेने १०० टक्के निकाल हा आमच्या बाजूने असणार आहे, अशी ही प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी दिली.