मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाईत जंगी स्वागत; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा शिंदेना गराडा

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आलं. वाई शहरातही प्रवेश करतातच उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे यांना चारी बाजूंनी गराडा घालत पुष्पगुच्छ, बुफे देऊन जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    वाई : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आलं. वाई शहरातही प्रवेश करतातच उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे यांना चारी बाजूंनी गराडा घालत पुष्पगुच्छ, बुफे देऊन जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे त्यांचं मूळ गाव महाबळेश्वर तालुक्यात दरे हे आहे. शिंदे यांची कर्मभूमी ठाणे ही असली तरी त्यांना मानणारा मोठा गट सातारा जिल्ह्यात कार्यरत आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांचे समर्थक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फ्लेक्स लावून समर्थन करीत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून तर सर्वांचा आनंद द्विगणित झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. गुरुवारी त्यांचे शिंदेवाडी फाट्यापासून ते महाबळेश्वर पर्यंत ठीक ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वाई तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या वेळे येथे त्यांचे प्रथम स्वागत करण्यात आले. यानंतर सुरूर फाटा, सायंकाळी पाच वाजता वाई शहराच्या प्रवेशद्वारावर सह्याद्रीनगर नाक्यावर स्वागतासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मुख्यमंत्री शिंदे यांचं आगमण होताचं त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला गराडा घातल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी केलेल्या सत्काराने मुख्यमंत्री भारावून गेले. वाईकरानी केलेले जल्लोषात स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णा पवार, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष काशिनाथ शेलार, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, चिटणीस यशवंत लेले,राकेश फुले, विजय ढेकाणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी संदीप जायगुडे, संतोष काळे, संकेत राठोड व कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, भाजप महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी वाई बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संजय खडसरे व त्यांचे पदाधिकारी, अॅड उमेश सणस, अॅड रविंद्र भोसले, अॅड आर आर भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन निवेदन दिले. ठाकरे समर्थकांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. पांचगणी येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वागत केले.