Breaking! पाऊस आणि खराब हवामानमुळं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, मुंबईत लँडिग…

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी जाणार आहेत. साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे.

    मुंबई : मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याला जाणार होते. पण खराब हवामानामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) भरकटल्याची माहिती समोर येत आहे. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही. मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस साताऱ्यातील त्यांच्या गावी जाणार आहेत. मात्र हेलिकॉप्टर भरकटल्यामुळं पुन्हा मुंबईत राजभवन येथे लॅन्डींग करण्यात आल्याची माहिती मिळते. (chief minister helicopter went astray due to rain and bad weather landing in mumbai)

    मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा…

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी जाणार आहेत. साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. मुख्यमंत्री काही दिवस दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही गावातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवड करणार अशी माहिती पुढे येत आहे. परंतु आता हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत लॅडिंग केल्यामुळं ते पुन्हा कधी साताऱ्यात जाणार याची काही माहिती मिळू शकली नाही.