मुख्यमंत्र्यांची पवारांसमोरच विरोधकांवर टोलेबाजी; मोठ्या गुंतवणुकीचे करार दावोसमध्ये झाल्याचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे (Ncp) नेते शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पवारांसमोरच दावोस करारांवरून विरोधकांना टोला लागावला आहे.

    पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे (Ncp) नेते शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यात एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पवारांसमोरच दावोस करारांवरून विरोधकांना टोला लागावला आहे. कुणी काहीही म्हटलं, तरी आपल्या राज्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे करार दावोसमध्ये झाले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दावोसमध्ये झालेल्या करारांवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांचा समाचार घेतला. मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालीये. सगळ्यांनीच गोड बोलायचे मी ही नुकताच दावोसला जाऊन आलो. शरद पवार अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं, तरी आपल्या राज्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे करार तिथे झालेत. हे सगळे उद्योग आपल्या राज्याच्या विविध भागांमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राने ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले, त्यापैकी काही कंपन्या महाराष्ट्रातच नोंदणीकृत असल्याचे उघड झाल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. असे एकनाथ शिंदे यावेळी यांनी सांगितले.

    शरद पवार मलाही मार्गदर्शन करतात

    शरद पवार सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, ते अनुभवी नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळेच कुठला माणूस सत्तेवर बसलाय, हे न पाहाता या राज्याच्या हितासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. मलाही ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात, सूचना करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे, एखादा माणूस, संस्था जेव्हा चांगले काम करतात, त्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यावर ते आणखीन चांगले काम करू लागतात. असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.