वाढत्या कोरोनामुळं काळजी घेण्याची गरज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

सध्या दिवसाला ४ हजार कोरोना रुग्ण (Corona patients) आढळत आहेत. त्यामुळे मास्क (Mask) घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आले (State cabinet meeting) कोविडविषयक (Covid-19) सादरीकरण आले, त्यावेळी ते बोलत होते.

  मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona patients) सातत्याने वाढ होत आहे. सध्या दिवसाला ४ हजार कोरोना रुग्ण (Corona patients) आढळत आहेत. त्यामुळे मास्क (Mask) घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आले (State cabinet meeting) कोविडविषयक (Covid-19) सादरीकरण आले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) होते.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते. आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्णसंख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे. यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत. सध्या २५ हजार सक्रीय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr.Pradeep Vays) यांनी दिली.

  विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

  कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

  राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

  राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांशी संबंधित खटले मागे घेण्यासाठी अशा घटनेत जिवीत हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

  अर्थ व सांख्यिकीमध्ये अपर संचालक पद

  अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील एकूण 996 पदांच्या सुधारित आकृतीबंधात अपर संचालक हे नियमित पद निर्माण करण्यास  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

  करमाळा, कळंब येथे न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय

  सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.