udhav thackrey

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणती भूमिका घेतायेत किंवा काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कालच्या एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नाराजी नाट्यानंतर त्यांनी जो प्रस्ताव दिलाय त्यावर मुख्यमंत्री काही निर्णय घेणार का? किंवा बोलणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकले. तर मविआच्या चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान कालच्या नाट्यानंतर आज राज्यमंत्री मंडळाची बैठक (State Cabinet meeting) होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऑनलाईल बैठकीला उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्र्याना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता दिल्लीत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) आहेत. तर राज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस याचं बैठकाचं सत्रं सुरु आहे.