Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

आमदार रमेश लटकेंच्या पार्थिवाला आज अनेकांनी पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रमेश लटकेंच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जनसामान्यांशी लटके यांची नाळ जोडली असल्यामुळं लोकांनी लटकेंच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

    मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहीती सर्वंत्र वाऱ्यासारखी पसरली. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलांय. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव आज सकाळी मुंबईत आणण्यात आले.

    आमदार रमेश लटकेंच्या पार्थिवाला आज अनेकांनी पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रमेश लटकेंच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जनसामान्यांशी लटके यांची नाळ जोडली असल्यामुळं लोकांनी लटकेंच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

    रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते.