
महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर असतोच अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सध्याचे राजकारण पावशेरचे असल्याचे सांगत देशात पेटापेटी सुरू असली तरी महाराष्ट्र पेटत नाही. पण जेव्हा महाराष्ट्र पेटतो तेव्हा तो समोरच्या जळून खाक केल्याशिवाय राहत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या हे माहित असले तरी विधान परिषद निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नसल्याचे व शिवसेनेतही कोणीच गद्दार राहिला नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते(Chief Minister Uddhav Thackeray targets BJP).
मुंबई : महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर असतोच अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सध्याचे राजकारण पावशेरचे असल्याचे सांगत देशात पेटापेटी सुरू असली तरी महाराष्ट्र पेटत नाही. पण जेव्हा महाराष्ट्र पेटतो तेव्हा तो समोरच्या जळून खाक केल्याशिवाय राहत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या हे माहित असले तरी विधान परिषद निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नसल्याचे व शिवसेनेतही कोणीच गद्दार राहिला नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते(Chief Minister Uddhav Thackeray targets BJP).
ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हते, तेव्हा हिंदुत्वाचा नारा शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेने बुलंद केला. आजचे जे हिंदुत्व चाललेय ते त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. लोकांचा कोणताही विचार न करता जर तुम्ही सरकार चालवत असाल तर राज्य करायला तुम्ही नालायक आहात असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रित ठेवणे ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगले चित्र दिसले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
माझा पक्ष हा पितृपक्षच आहे, कारण माझ्या पित्याने पक्ष स्थापन केला आहे. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले.आईचे दुध विकणारा नराधम शिवसेनेत नको, असा इशारा दगाबाजांना ठाकरेंनी दिला आहे.
भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा. हातात काम नसेल, तर राम राम करण्यात अर्थ नाही, अशी वचन द्यावीत जी पाळता येतील. अग्निपथ योजना मृगजळ आहे. शिकवणार सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार आणि नाव अग्निवीर, अशी बोचरी टीका त्यांनी केली.