देवेंद्रजी, बाबरी पाडली तेव्हा तुमचं वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

देवेंद्रजी, बाबरी पाडली तेव्हा तुमचं वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती का? आज मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंत? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे(Chief Minister Uddhav Thackeray's attack on Devendra Fadnavis ).

    देवेंद्रजी, बाबरी पाडली तेव्हा तुमचं वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती का? आज मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंत? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे(Chief Minister Uddhav Thackeray’s attack on Devendra Fadnavis ).

    देवेंद्रजी तुम्ही एक संदर्भ गाळलात, मुफ्तींनी जेव्हा तुमच्या मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले होते, पाकिस्तान हुर्रियत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो. निवडणुका शांततेत पार पडल्यावर दहतवाद्यांचे आभार मानले. काश्मिरात चाललेलं तेव्हाही सुरू होतं. मेहबुबा मुफ्ती तुमच्या कानात वंदे मातरम बोलतात का असंही मुख्यमंत्री म्हणाले.

    फडणवीस बाबरी पाडताना शाळेच्या सहलीला गेले होते का? तुमचं वय किती होतं बोलता किती. फडणवीसांनी बाबरीवर चढायचा प्रयत्न केला असाता तर बाबरी पडली असती. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदूत्व सोडलं नाही सत्ता असली नसली तरी फरक पडत नाही पण हिदूत्व सुटणार नाही.

    तुम्ही एनडीएमध्ये किती पक्ष जमवले होते. काय काय लोकांचा एकही खासदार नसताना एनडीएत होते. नितीश कुमार यांच्यासमोर हिंमत आहे का तुमची असा सवालही त्यांनी केला.