Chief Minister Uddhav Thackeray's first blow

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी पहिलाच वार भाजपवर केला आहे. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत असे म्हणत त्यांनी थेट भाजप नेत्यांवनर निशाणा साधला आहे(Chief Minister Uddhav Thackeray's first blow).

    मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी पहिलाच वार भाजपवर केला आहे. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत असे म्हणत त्यांनी थेट भाजप नेत्यांवनर निशाणा साधला आहे(Chief Minister Uddhav Thackeray’s first blow).

    आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे.

    आमच्या जुन्या फोटोमुळे भाजपचा गैरसमज झाला असेल. एक भ्रम निर्माण केला जातोय की हिंदुत्वाचे रक्षक कोण आहेत. हे बसलेले शिवसैनिक हिंदुत्वाचे खरे रक्षक आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.