गाव कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी साधला संवाद, कोरोनाच्या उपाययोजनांबाबत केली चर्चा

आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी  मुख्यमंत्र्यांनी संवाद(Chief Minister Video Conference With Village Heads) साधला.

  मुंबई: राज्यात(Maharashtra) सरकारने कोरोनामुक्त गाव योजना(CoronaFree Village Scheme) जाहीर केली आहे. त्यात सरपंचाना त्यांचे गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाच काही गावातील सरपंचांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.

  आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी  मुख्यमंत्र्यांनी संवाद(Chief Minister Video Conference With Village Heads) साधला. कोविड संदर्भात ते  करीत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या.

  खालील गावाच्या सरपंचांनी कोविडचा मुकाबला ते कसे करीत आहेत ते सांगितले.

  जिल्हानिहाय  संवाद
  औरंगाबाद विभाग जिल्हानिहाय (कंसात तालुका) : औरंगाबाद – कुंभेफळ (औरंगाबाद). बीड – लुखेगांव (माजलगाव). जालना – रांजणी (घनसांवगी), जयपूर (मंठा). उस्मानाबाद – शिंगोली (ता. उस्मानाबाद). नांदेड – भोसी (भोकर). लातूर – सिकंदरपूर (लातूर), अलमला (औसा). परभणी – खडगाव (गंगाखेड). हिंगोली – मेठा (औंढा-नागनाथ).

  नागपूर विभाग : भंडारा –शहापूर (भंडारा). चंद्रपूर – जाम तकुम (पोंभुर्णा), राजगड (मुल). गोंदिया – करंजी (आमगाव). नागपूर – पिंपळगाव (हिंगणा), शिरपूर (नागपूर ग्रामीण).

  अमरावती विभाग : अकोला – कापसी रोड (अकोला). अमरावती – धामणगाव बधे (मोताळा). यवतमाळ – अकोला बाजार (यवतमाळ), खडका (महागाव). वाशिम – गोवर्धन (ता. वाशिम).

  यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,  पद्मश्री पोपटराव पवार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची उपस्थिती होती.