भरपावसात मुख्यमंत्र्यांनी घेतले सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन

नांदेड येथील सभा, हिंगोली येथील कावड यात्रा आणि सभा आटोपून ते एक वाजता सचखंड गरुद्वारा येथे दाखल झाले. यावेळी, गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शीख धर्मियांची मानाची पगडी बांधून आणि तलवार भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

    मुंबई : नांदेड-हिंगोली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिंगोली दौरा (Hingoli Tour) आटोपून मध्यरात्री १ वाजता भरपावसात नांदेड (Nanded) येथील तख्त संचखड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वारा (Takhat Sachkhand Sri Hazur Abchal Nagar Sahib) येथे दर्शन घेतले.

    पावसाचा वाढता जोर (Heavy Rain) आणि वेळेची तमा न बाळगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री एक वाजता सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दाखल होत नतमस्तक झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत नांदेडात येईपर्यंत निश्चितपणे माहिती नव्हती. शेवटी मुख्यमंत्री शिंदे याचे नांदेडमध्ये आगमन झाले.