शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, मुंबईतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बालसंगोपनाची रजा मंजूर

मुंबई (Mumbai) महापालिकेने खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना(Child Care Leave In Primary Schools) नुकतीच बालसंगोपन रजा मंजूर केली.

    मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी(Child Care Leave) मिळणाऱ्या १८० दिवसांच्या रजेपासून मुंबई पालिका शाळेतील आणि खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक तीन वर्षांपासून वंचित होते. ही रजा पालिकेच्या अनुदानित शाळेतील शिक्षकांना(Teachers Demand Of Child Care Leave Approved) मंजूर व्हावी यासाठी शिक्षक संघटनांनी तीन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मुंबई (Mumbai) महापालिकेने खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना(Child Care Leave In Primary Schools) नुकतीच बालसंगोपन रजा मंजूर केली.

    राज्य शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना तत्कालीन भाजप सरकारमधील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाल संगोपनासाठी १८० दिवसांची रजा मंजूर केली होती. दोन अपत्यांना लागू असलेली ही रजा अपत्याचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांसाठी २०२० ला स्वतंत्र परिपत्रक काढून बालसंगोपनाची रजा मंजूर केली. परंतु मनपा अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यापासून वंचित ठेवले होते.

    ही रजा पालिकेतील शिक्षक व खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी राज्य शिक्षक परिषदेकडून सतत ३ वर्ष पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे व मुंबई शिक्षक संघाचे आनंद पवार यांनी मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करत होते. त्याचप्रमाणे मनपा शिक्षण समिती सदस्य व नगरसेवक नेहल शहा व पंकज यादव यांनीही हा विषय शिक्षण समितीमध्ये वारंवार मांडला. अखेर या सर्वांच्या प्रयत्नाला २४ सप्टेंबर २०२१ रोजी यश आले पालिकेने १० पातळ्यांवर परिपत्रके व ठराव करत तीन वर्षांनंतर खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना बालसंगोपन रजा मंजूर केली. २३ जुलै २०१८ ला शासन निर्णय होऊनही ही रजा ९ मार्च २०२१ पासून लागू होणार असल्याने या कालावधीत ज्यांची अपत्यांची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांना ही रजा मिळणार नसल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे व मुंबई शिक्षक संघाचे आनंद पवार यांनी दिली.