
भाडेतत्त्वावर लावलेल्या चार चाकी वाहनाचे बिल अदा करण्याकरिता तक्रारदारकडून नेवासा पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला ४५ हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून ताब्यात घेतले असून त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा: भाडेतत्त्वावर लावलेल्या चार चाकी वाहनाचे बिल अदा करण्याकरिता तक्रारदारकडून नेवासा पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला ४५ हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून ताब्यात घेतले असून त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले की फिर्यादीचे चारचाकी वाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लावण्यात आले होते. सदर वाहनाचे बिल एक लाख १४ हजार २६१ रुपये मंजूर करून तक्रारदार याचे बँक खात्यात जमा करण्यासाठी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सोपान सदाशिव ढाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून २३ जून रोजी लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी बाल विकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे याने पंचायत समक्ष पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी पथकासह सापळा लावून त्याला लाच घेताना पकडले.