When will the stopped red bus run smoothly? There are still two chances to appreciate the badass!

या अपघातानंतर डेपो परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरील लोकांनी लगेच दोन्ही मुलांना जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं.

    पालघर : एसटी बस चालवताना बऱ्याच वेळी ड्रायव्हरकडून (ST Bus Driver) अनावधान काही चुका होतात. यामुळे अनेकदा दुर्घटनाही घडत असतात. अशीच एका बस ड्रायव्हरची चूक एका 11 वर्षीय मुलाच्या जीवावर उठली आहे. बस रिव्हर्स घेताना ड्रायव्हरने भिंतीला धक्का दिल्याने भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला आहे. ओविस मडकिया असं मृत मुलाचं नाव आहे. तर, सिंनाल मोडिया रफिकभाई असं  जखमी असलेल्या मुलाचं नाव आहे.

    पालघर (Palghar) जिह्यातील जव्हार(Jawhar)  जव्हार डेपो मध्ये ही दुर्घटना घडली आहे. डहाणूहून आलेली बस जव्हार डेपोमध्ये येताच बसच्या ड्रायव्हरने नेहमी प्रमाणे नेहमीच्या ठिकाणी  बस उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी ड्रायव्हरने बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एसटी बस  संरक्षक भीतीला धडकली. जोरात धडक बसल्याने भिंत कोसळली. मात्र, ही भिंत अंगावर पडून एका अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर,  पंधरा वर्षीय मुलगा यात गंभीर जखमी झाला आहे.

    अपघातानंतर ड्रायव्हरसह कंडक्टर फरार

    या अपघातानंतर डेपो परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरील लोकांनी लगेच दोन्ही मुलांना जव्हारच्या कुटीर रुग्णालयात  दाखल केलं. मात्र, तिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. तर दुसऱ्या जखमी मुलावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर  बसचा चालक आणि वाहक दोघेही बस जागीच सोडून फरार झाले आहेत. जव्हार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.