Child dies due to pubji game Shocking incident in Palghar

पबजी या मोबाइल गेमच्या वेडापायी एक मुलगा इमारतीवरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या 16 वर्षीय मुलाचे नाव असून पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे ही घटना घडली आहे(Child dies due to pubji game Shocking incident in Palghar ).

    पालघर : पबजी या मोबाइल गेमच्या वेडापायी एक मुलगा इमारतीवरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या 16 वर्षीय मुलाचे नाव असून पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे ही घटना घडली आहे(Child dies due to pubji game Shocking incident in Palghar ).

    पबजी खेळताना खाली पडल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला. पालघरच्या रिलिफ रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

    शादान शिरगाव येथील एका निर्माणाधिन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसून पबजी गेम खेळत होता. तो या खेळात इतका गुंग झाला की आपण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आहोत याचाही त्याला विसर पडला. खेळता खेळता तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला.