मुलांनी केलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून आईला मारहाण

मुलांनी शेजाऱ्यांशी केलेल्या भांडणाच्या रागातून सहा जणांनी आईलाच शिवीगाळ करत मारहाण केली आहे. ही घटना बावधन येथे रविवारी (दि.१८) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.

    पिंपरी : मुलांनी शेजाऱ्यांशी केलेल्या भांडणाच्या रागातून सहा जणांनी आईलाच शिवीगाळ करत मारहाण केली आहे. ही घटना बावधन येथे रविवारी (दि.१८) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.(Pimpri Crime) महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रतिक कांबळे, चार महिला आरोपी व अनिकेत वाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिक कांबळे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलांनी प्रतिक याला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून प्रतिक याने त्याच्या घरच्यांसह फिर्यादी यांना शिवीगाळ केली तसेच गैरवर्तन करत फिर्यादीला मारहाण केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.