सार्वजनिक शौचालयात बालकाचा मृतदेह, घातपाताचा संशय; पंढरपूरमधील घटनेची उलटसुलट चर्चा

पंढरपूर (Pandharpur) शहरातील (City) संत पेठ परिसरातील महात्मा फुले चौकाच्या जवळच असलेल्या एका सार्वजनिक शौचालयात मध्यरात्री एका मुलाचा मृतदेह आढळून आला. दहा वर्ष वयाच्या मुलाच्या मृतदेहाची अवस्था देखील अत्यंत वेदनादायी होती.

  पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) शहरातील (City) संत पेठ परिसरातील महात्मा फुले चौकाच्या जवळच असलेल्या एका सार्वजनिक शौचालयात मध्यरात्री एका मुलाचा मृतदेह आढळून आला. दहा वर्ष वयाच्या मुलाच्या मृतदेहाची अवस्था देखील अत्यंत वेदनादायी होती. मृत्युमुखी पडलेल्या मुलाची ओळख पटली असून कृष्णा तम्मा धोत्रे असे त्याचे नाव आहे. मृतदेहाचे पोट पूर्णपणे फाडून टाकले आहे. ही अवस्था पाहता या बालकाचा खून झाल्याची शंका अनेकांना येत असून त्याच्या कुटुंबीयांनी देखील असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. बालकाचे पोट मोकाट जनावरांनी काढल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली, परंतु या शक्यतेला आधार मिळत नाही.

  गजबजलेल्या परिसरात जनावरांनी हल्ला केला असता तर तो आजूबाजूच्या लोकांच्या वेळेत लक्षात आलेा असते, शिवाय त्याचा मृतदेह सार्वजनिक शौचालयात आढळून आला आहे. बालकाच्या नातेवाईकाकडून मात्र हा कोणाचा तरी प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. या एकंदर घटनेने आधी संत पेठ परिसरात आणि नंतर मात्र संपूर्ण शहरात खळबळ आणि चर्चेचा विषय बनला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. वेगवेगळ्या चर्चा सुरू हाेत अाहेत.

  प्रकरण गूढ आणि रहस्यमय

  पोलिसांच्या तपासात या घटनेतील सत्य समोर येणार आहे, परंतु एकूण परिस्थिती लक्षात घेता. हा खून असल्याचीच शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय बालकाच्या कुटुंबीयांनी देखील हा खून असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे प्रकरण गूढ आणि रहस्यमय बनले असून पोलिसांच्या तपास आणि वैद्यकीय अहवालात काय समोर येते, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

  तपासानंतर हाेईल उलगडा

  पंढरपूर येथील सार्वजनिक शौचालयात एका बालकाचा अत्यंत वाईट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून हा खून आहे की घातपात आहे. हा मात्र मोठा प्रश्न बनला असून पोलीस तपासानंतरच याबाबतचा उलगडा होणार आहे.