चिंचपोकळीच्या चिंतामणीचे मोठ्या उत्साहात झाले आगमन; गणेश भक्तांची अलोट गर्दी

    मुंबई : गणपती बाप्पा मोरया! लाडक्या गणरायाचे पुढच्या हप्त्यामध्येच आगमन होणार आहे. मुंबईमधील लालबाग येथील चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. लाखोंच्या संख्येने भाविक यावेळी जमले होते. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली. चिंचपोकळीच्या गणरायाचे मोठ्या वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.

    चिंचपोकळीच्या चिंतामणीचे उत्साहात स्वागत

    मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. मुंबईमधील लालबाग येथील चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. या आगमनादरम्यान गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळलेली पाहावयास मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी नाचत जल्लोषात गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे.

    मुंबईतील प्रसिद्ध गणपती

    चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील प्रसिद्ध गणपती आहे. साहजिकच या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. चिंतामणीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असते. त्यामुळे मंडपाच्या प्रवेशद्वारावर मुंगी शिरायलाही जागा राहत नाही.