
३० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल, हिरोहोंडा गाडी जप्त करण्यात आली आहे.
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथील बांग्लादेशी लोकांना काही दिवसांपूर्वी पकडल्याची घटना ताजी असताना आता सावर्डे येथे दोन बांग्लादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय ते बांग्लादेशामधून भारतात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.
ही घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी समोर आली. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गुरव यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मुश्ताक शेख महंमद अतिआर शेख (३७), तसेच मोहम्मद शाहीद गाझी (२३) या बांग्लादेशींना सावर्डे पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून ३० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल, हिरोहोंडा गाडी जप्त करण्यात आली आहे. हे दोन तरूण बांग्लादेश ते भारत कोणत्याही कागदपत्राशिवाय भारत-बांग्लादेश सीमेवरून मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले व भारतात अवैधरित्या प्रवेश करून सावर्डे येथे वास्तव्यास राहिले. भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ आणि परकीय नागरिक कायदा १९४६ च्या अन्वये या दोघांना अटक झाली आहे.