
एक्सप्रेस महामार्गाची उभारणी ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करुन केली आहे.
उरण : जेएनपीए बंदर ते चिर्ले एक्सप्रेस महामार्गावरील (JNPA Port to Chirle Expressway) गंगा रसोई समोरील सर्व्हिस रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना गुरुवारी दि. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधारात घडली. या अपघातात दोन पादचारी ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. परंतु या अपघाताची माहिती पोलिसांना नसल्याचे समजले आहे. या अपघातानंतर चांदणी चौक येथे खड्ड्यामध्ये मालवाहू कंटेनर पडल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली आहे. त्यामुळे नोकरदार प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेएनपीए बंदर प्रशासनाने देश परदेशात मालाची आयात – निर्यात वेळच्या वेळी करण्यासाठी जेएनपीए बंदर ते चिर्ले मार्गे पळस्पे फाटा, कळंबोली या एक्सप्रेस महामार्गाची उभारणी ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करुन केली आहे. मात्र या महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग, वर्दळ ही आरटीओ तसेच पोलीस, वाहतूक विभाग यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने पादचारी, स्थानिक प्रवाशी वाहनाना रात्री अपरात्री सातत्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
जेएनपीए बंदर ते चिर्ले एक्सप्रेस महामार्गावरील गंगा रसोई समोरील सर्व्हिस रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधारात घडली आहे. या अपघातात दोन पादचारी ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताचे दृश्य हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. मात्र या अपघाताची माहिती पोलिसांना नसल्याचे समजत आहे. या अपघातानंतर चांदणी चौक येथील खड्ड्यात मालवाहू कंटेनर पडल्याची घटना शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी घडली. त्यामुळे नोकरदार प्रवासी नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अपघाताचे गांभीर्य ओळखून नवीमुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.