chitra wagh

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन उर्फी जावेदवर पुन्हा टीका केली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ सोशल मीडिया इन्ल्प्युएन्सर उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवरून तिच्यावर टिका करत आहेत. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदविषयीची आपली भूमिका मांडली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगानाच योग्य नाही. नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन करणं योग्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विरोध उर्फीला नाही तर तिच्या कपड्यांना आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

    एका बाईने मला व्हिडिओ पाठवल्यानंतर मला उर्फी जावेद कळली. त्या बाईने मला विचारलं या उर्फीचं काहीतरी कर णार आहात का ? एका आईने मला ती व्हिडिओ क्लिप पाठवली होती. कारण तिच्या मुलीवर दिड वर्षापुर्वी अत्याचार झाला होता.

    उर्फी मुस्लिम असल्याने तिच्यावर चित्रा वाघ आणि भाजप टीका करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र उर्फीचा धर्म बघून तिच्यावर टीका करत नाही. विरोध तिला नाही तिच्या कपड्यांना आहे. तिचे कपडे बघून टीका करत असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या. समाजस्वास्थ जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं, असंही त्यांनी सांगितलं. विरोधकांना समाजस्वास्थ्य महत्त्वाचं आहे की नाही हे त्यांनी सांगावं. नंगानाच बंद झाल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याचा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. महिला आयोग आणि उर्फीचे सल्लागार चुकीचे आहेत. त्यामुळे त्यांना तोंडावर आपटायला लागलं आहे. करेक्ट कार्यक्रम करेक्ट दिवशी करणार असल्याचंही म्हटलं.

    महिला आयोगाची भूमिका दुहेरी आहे. महिला आयोगाने ‘अनुराधा’ वेबसीरिजला नोटीस पाठवली होती. अनुराधाच्या पोस्टरवरील देहप्रदर्शनावर त्यांनी आक्षेप घेतला होता. मग उर्फीच्या देहप्रदर्शनाच्या लाईव्ह शोवर महिला आयोग काहीच भूमिका का घेत नाही ? असंही त्यांनी विचारलं. कोणीही उर्फीच्या अंगप्रदर्शनाचं समर्थन करु नये, असंही त्या म्हणाल्या.