chitra wagh rupali chakankar and urfi javed

उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ यांच्या विरोधात आज तक्रार केली आहे. तसंच आज तिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेटही घेतली आहे. मात्र उर्फी नीट कपडे घालेल तेव्हाच हे प्रकरण मिटेल, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली आहे.

  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातला वाद आणखी चिघळत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर गुन्हा (Crime) दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर उर्फी जावेदने आता महिला आयोगाकडे तक्रार केली असून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या विरोधात आज तक्रार केली आहे. तसंच आज तिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेटही घेतली आहे. मात्र उर्फी नीट कपडे घालेल तेव्हाच हे प्रकरण मिटेल, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

  चित्रा वाघ यांनी सांगितलं की, “तिला कुठे जायचंय तिथे जाऊदे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र इथे विषय समाजस्वास्थ्याचा आहे. माझी भूमिका मी आधीच मांडलेली आहे. माझी लढाई सुरुच राहणार आहे. आम्हाला जे करता येईल ते आम्ही करूच. हे प्रकरण आता तेव्हाच संपेल जेव्हा ती कपडे घालेल. तिने व्यवस्थित कपडे घालावेत. ती अशी फिरेल तर हे प्रकरण चालूच राहील.”

  उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल केलेले वकील नितीन सातपुते म्हणाले, “मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. सार्वजनिक ठिकाणी चित्रा वाघ धमकी देत आहेत. हा गुन्हा आहे. आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे. उर्फी स्वतः येऊन तिची भूमिका मांडेल.”

  काय आहे प्रकरण?
  मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. तसंच तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद वारंवार ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचत होती. ‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’ अशी पोस्ट उर्फीने काही दिवसांपूर्वी केली होती. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई करण्यासंदर्भातलं पत्र त्यांनी पोलिसांनाही दिलं होतं.

  पुढे हे प्रकरण महिला आयोगाकडे गेल्यावर महिला आयोगाने उर्फीवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर टीका केली होती. आता आज उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला आहे.