chitra wagh and urfi javed

‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’ असं ट्विट उर्फीने (Urfi Javed Tweet) केलं आहे. याआधी उर्फीने आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss”, असं म्हटलं होतं.

    चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात गेले अनेक दिवस आरोप प्रत्यारोप आणि टीकेचं सत्र सुरु आहे. अशातच उर्फीने एक ट्विट केलं आहे. ‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’ असं ट्विट उर्फीने (Urfi Javed Tweet) केलं आहे. याआधी उर्फीने आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss”, असं म्हटलं होतं. तसेच उर्फीने याआधी “जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे”,असं आव्हान तिने चित्रा वाघ यांना दिलं होतं.

    अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातील महिला राजकारणी आमने – सामने आल्या. उर्फीचं चित्रा वाघांवर ट्विट वॉर सुरू आहे. तर चित्रा वाघ देखील पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा टीका केली आहे. “विरोध केला नाही तर चौका चौकात नागडे नाच पाहायला मिळतील’”, असं त्यांनी म्हटलं आहे.

    त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मातीतील एका महिलेनं मला उर्फीचे इन्स्टाग्रामचे रिल्स पाठवले. मी ते पाहून हैराण झाले. माझं डोकंच फिरलं. असे नंगे नाच मुंबईत चालतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली नागडे नाच सुरू आहेत. आम्ही विरोध केला नाही तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यात असे नागडे नाच सुरू होतील”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.