चित्रा वाघ यांच्या खांद्यावर पक्षाने टाकली नवी जबाबदारी, भाजपच्या ‘या’ विभागाच्या प्रभारी

महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ(Chitra Wagh Is new Head OF Youth Wing Of BJP) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

    मुंबई: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ(Chitra Wagh) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ(Chitra Wagh Is new Head OF Youth Wing Of BJP) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

    राठोड यांचा राजीनामा घेण्यात मोठा वाटा
    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्रा वाघ यांनी जवळपास २० वर्षे काम केले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली. परंतु २०१९ च्या  विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तिथेही चित्रा वाघ यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक दाखवली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव एका युवतीच्या मृत्य प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खुश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.

    भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी
    याबाबत चंद्रकांत पाटील यांनी वाघ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असे म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले आहेत.