
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
कोरेगाव : गेल्या काही महिन्यापासून कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून व्यक्त केली जाणारी भावना आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांतून सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सौ. चित्रलेखा माने कदम आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने – कदम यांचे श्री. बावनकुळे यांनी पुष्पहार घालून पक्षात स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रवक्ते केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे उपस्थित होते. तर या प्रवेश सोहळ्याबद्दल महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, आ. श्रीकांत भारतीय, आ. सुधीर गाडगीळ, पक्षाच्या जनरल सेक्रेटरी माधवी नाईक यांनी चित्रलेखा माने – कदम यांचे अभिनंदन केले.
भाजप हा केवळ राजकारण करणारा पक्ष नाही. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडासह साहित्यिक अशा विविध क्षेत्रात चांगले योगदान देणा-या व्यक्तित्वाचा सन्मान आणि योग्य संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा समाजासाठी अधिक प्रगल्भतेने उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष आहे. त्यामुळे सौ. चित्रलेखाताईना आता त्यांच्या अपेक्षेनुरूप कार्यरत राहण्यासाठी योग्य संधी देण्याचा निश्चित प्रयत्न होईल, असे कौतुकोदगार बावनकुळे यांनी व्यक्त केले.
चित्रलेखा माने कदम यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीतील वेगळेपण मांडून भविष्यात पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वावलंबी युवा आणि सक्षम महिला घडवण्यासाठी प्राधान्याने कार्यरत राहण्याचे मत व्यक्त केले.
यावेळी अमरसिंह जाधवराव, हर्षवर्धन कदम, भाजपच्या शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने, अनंतराव माने, लहुराज माने, अंकुशराव भोसले, युवानेते निलेश माने व रणजित माने, विक्रमसिंह माने, प्रल्हाद शेरकर, लिंबाजी सावंत, शेखर माने, अशोक माने, डॉ. निलेश भोसले, विजय माने, रणजित कदम, तुषार चव्हाण, सतिश भोसले, रणजित माने, तुषार माने, अॅड सुनील माने, राजकुंवर राणे, माधुरी भोसले, शुभांगी माने यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.