
कागल तालुक्यातील संस्थानकालीन मुरगूड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुरगूड : कागल तालुक्यातील संस्थानकालीन मुरगूड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुरगूड नगरपालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांपैकी १० जागा महिलांना अारक्षित झ्ााल्या अाहेत. यातील दहा जागांपैकी दोन जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित आठ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. अन्य दहा जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. तर ९ जागा सर्वसाधारण झाल्या आहेत.
आजरा भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रभाग आरक्षण सभेच्या नियंत्रण अधिकारी म्हणून वसुंधरा बारवे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात अाली. यावेळी मुख्याधिकारी अजिंक्य पाटील उपस्थित होते. सोडतीसाठी नगरपरिषदेचे अधिकारी प्रकाश पोतदार, रणजित निंबाळकर, अमर कांबळे, अमोल गव्हारे यांनी सहकार्य केले. यामध्ये दहा प्रभागापैकी प्रभाग ४, ९ व १० हे अनुसुचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग २ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ३ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ४ : अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग ५ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ६ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ७ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ८ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ९ : अनुसुचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग १० : अनुसुचित जाती महिला व सर्वसाधारण