माकड चावले, तर…?; सरकारी कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी नागरिक हैरान

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासन कामाला लागले आहे, मराठा समाजातील गराजूवंतांना आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून सर्व्हेक्षण सुरू आहे, मात्र या सर्व्हेक्षणात अनेक गजब प्रश्नांची मालिका दिसत असल्याने हा केवळ शासनाचा वेळ काढूपणा आहे की काय अशी शंका येत आहे.

  सांगली/ प्रवीण शिंदे : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासन कामाला लागले आहे, मराठा समाजातील गराजूवंतांना आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून सर्व्हेक्षण सुरू आहे, मात्र या सर्व्हेक्षणात अनेक गजब प्रश्नांची मालिका दिसत असल्याने हा केवळ शासनाचा वेळ काढूपणा आहे की काय अशी शंका येत आहे.

  तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदी- कुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का ? कुत्रा किंवा माकड चावले, कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात पाणी कोण भरते? मानसिक आरोग्यावर उपचार घेता का? विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का ? इतकेच नाही, तर तुम्ही – तुम्ही आंघोळ कुठे करता? यासारख्या अनपेक्षित प्रश्नांसह सुमारे १५० प्रश्नांची सरबत्ती मराठा सर्वेक्षणात केली जात आहे. काही प्रश्नांची उत्तरे सावधपणे दिली जात असल्याचा प्रत्यय घरोघरी जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना येतो आहे, तर काही ठिकाणी वादावादी देखील होत आहे.

  आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला धडकले. आंदोलनाला दिलेल्या अश्वासनाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या मदतीने तातडीने मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे मात्र, काही ठिकाणी अॅप काम करीत नसल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना आला, काहींचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या दिवशीही राज्य मागासवर्ग आयोगाकडे रजिस्टर न झाल्याने त्यांना प्रत्यक्ष काम सुरू करता आलेले नाही,

  मात्र, काही कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून, मराठा कुटुंबांमध्ये जाऊन माहिती भरून घेतली जाते आहे. विशिष्ट अॅपवर माहिती भरण्याचे निर्देश आयोगाने दिले असून, एका मराठा कुटुंबाकडील माहिती त्यामध्ये फीड करण्यास किमान २० ते २५ मिनिटे लागत असल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना येतो आहे. त्यामुळे दिवसभरात एक कर्मचारी फार तर १५ ते २० कुटुंबांचेच सर्वेक्षण पूर्ण करीत आहे.

  केवळ नावाची अन् जातीची नोंद मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी १४८ प्रश्न तयार करण्यात आले आहेत. संबंधित कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात यावी, विचारसरणी, दिनक्रम, राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता लक्षात यावा असे प्रश्न या प्रश्नावलीतून विचारण्यात आले आहेत. संबंधित कुटुंब कोणत्याही जातीचे असो, सर्वेक्षणात त्याची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा नसलेल्या अन्य प्रवर्गातील कुटुंबप्रमुखाचे नाव, जात, प्रवर्ग याची माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनिटांचा कालावधी लागतो, अशी माहिती सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांनी दिली.

  एका सर्व्हेसाठी २० ते २५ मिनिटे मराठा सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांकडून मंगळवारपासून सर्वेक्षण सुरू झाले. सव्र्व्हे करणाऱ्यांच्या अनुभवानुसार, एकेका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागत आहे, तर मराठेतर कुटुंबांची माहिती नोंदवायला पाचते सात मिनिटे लागतात. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा ताण कर्मचाऱ्यांवर आहे.