निलेश सांबरेंना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद, विरोधी पक्ष गटांमध्ये खळबळ

नांदगाव येथे ही यात्रा आली असताना येथील महिलांनी पारंपारिक पद्धतीने निलेश सांबरे यांच्या प्रचाराचे गीत सादर करत निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीन या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.

    शहापूर : भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात काढलेल्या विजय निर्धार यात्रेला नागरिकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांना मिळणाऱ्या या वाढत्या प्रतिसादाने मात्र विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

    सांबरे यांच्या विजय निर्धार यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. विजय निर्धार यात्रेच्या माध्यमातून ठिकठीकाणी ते गाव पाड्यात फिरून जनतेशी संवाद साधत आहेत , त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत . त्यांच्या यात्रेला तसेच चौकसभांना लोकांची उत्स्फूर्त गर्दी होत आहे. आज सकाळी सावरोली गावात असललेल्या हनुमंताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत विजय निर्धार यात्रेला सुरुवात झाली. हजारो ग्रामस्थ महिला -पुरुष या जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी झाले होते. नांदगाव येथे ही यात्रा आली असताना येथील महिलांनी पारंपारिक पद्धतीने निलेश सांबरे यांच्या प्रचाराचे गीत सादर करत निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीन या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.

    या मार्गातील खरीवली, बरडेपाडा, वाचकोले, किनवली, बांगर शेलवली, गेगाव, असनोली, मुगाव, परटोली, मलेगांव, शेणवा, साठगाव, शिलोर, धसई, शेलवली, सांपगांव फाटा, खुटघर फाटा, कलभे फाटा, आसनगांव, वालशेत, काजल विहीर आदी गावांमध्ये विजय निर्धार यात्रेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी सांबरे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात सांबरे यांच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्ते-नागरिकांकडून देण्यात येत होत्या. सांबरे यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आबालवृद्ध पुढे येत होते. महिलावर्गाकडून सांबरे यांना औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

    जवळजवळ सर्व गावांमध्ये जिजाऊ संघटनेकडून विविध योजनांचा लाभ मिळालेले नागरिक पुढे येऊन निलेश सांबरेंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत होते. त्या सर्वांनीच सांबरे यांना खासदार म्हणून निवडून आणण्याचा मनोदय बोलून दाखवला. पुढे पाशाणे, वेहलोली फाटा, खातीवली, वाशिद, शहापुर शिवतीर्थ, पंडित नाका, चेरपोली, आटगांव पुनधे मार्ग, चेरपोली, नडगांव, शेंदरून या गावांमध्येही विजय निर्धार यात्रेची रात्री उशिरापर्यंत नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येत नागरिक, कार्यकर्ते सांबरे यांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते.