जुना आग्रा रोड परिसरात जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांच्या छापा; तेरा जणांना घेतले ताब्यात

धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या राजकमल टाकी समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पथकाने छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करीत 13 जणांना ताब्यात घेतले.

    धुळे : धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या राजकमल टाकी समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पथकाने छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करीत 13 जणांना ताब्यात घेतले.
    धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांना गुप्त माहिती मिळाली होती की जुना आग्रा रोड परिसरात राजकमल टाकी समोर साई ऑनलाईन मेन स्टार लॉटरी या ठिकाणी खेडला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्यासह पथकाने छापा टाकला असता जवळपास या ठिकाणी तेरा लोक जुगार खेळताना मिळून आले आहे. त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी दिले आहे.
    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे.