वारकरी भवनावरून शिंदे गट शिवसेना-मनसे यांच्यात जुंपली; शिवसेना नेत्याचा मनसे आमदारांना सवाल, मनसेकडून जोरदार प्रतिउत्तर

  दिवा/कल्याण: आता आषाढी वारी जवळ आलेली असताना, दिव्यात वारकरी भवनावरून शिंदे गट शिवसेना आणि मनसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यात वारकरी भवन तयार होत आहे. दिव्याची पंढरी होणार आहे. मात्र, काही लोकांनी घोषणा केली होती की, स्वखर्चातून आगरी कोळी वारकरी भवन बांधू त्याचे काम सुरू झाले नाही, अशी टीका शिवसेना युवासेनेने दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता मनसे  आमदार राजू पाटील यांच्यावर केली आहे. आता मनसेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाच्या ठरणार आहे.
  शिवसेना नेते विरुद्ध मनसे आमदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर
  आमचे खासदार हवेत किंवा ट्विटरवर आश्वासन देत नाही, स्वखर्चातून वारकरी भवन बांधू घोषणा करणाऱ्यांचा काय झाले? असा सवाल शिवसेना नेत्यांकडून मनसे आमदारांना होत आहे. आता त्यावर मनसे आमदाराकडून शिवसेना नेत्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
  तर पाकीटमारी करून किंवा ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन पैसे कमविले नाही, वारकरी भवन बांधणारच
  मनसे आमदारांचे शिवसेना नेत्याला  प्रतिउत्तर
  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वास्तूचे लवकरच भूमिपूजन
  डोंबिवली व दिव्याच्या वेशीवर प्रशस्त आगरी कोळी वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या बास्तूचे भूमिपूजन 7 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
  दीपेश म्हात्रे शिवसेना युवासेना नेता
  पाकीटमारी करून किंवा कंत्राटदाराकडून टक्केवारी घेऊन  पैसै कमिविले नाहीत. वडिलांच्या नावाने वारकरी भवन बांधणारच असे मनसे आमदार राजू पाटील यांचे शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधील पाणीटंचाई संदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. यादरम्यान त्यांनी दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.