
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय जाहीर केला. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर शिंदे गटाकडून वेळोवेळी ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे.
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय जाहीर केला. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर शिंदे गटाकडून वेळोवेळी ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे. असे असताना आता ठाण्यातील शिवाई नगरच्या शाखेवर ताबा घेण्यावरून शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. त्यावरूनच दोन्ही गटात राडा झाला.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा निर्णय बाकी असताना निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याने ठाकरे गटाची चिंता अधिकच वाढली. यापूर्वी अनेक शाखांवरून वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता ठाण्यात वाद होताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बहाल केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेकदा वाद होत आहेत. ठाण्यात कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील राडा सावरत त्यांच्यात समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गटातील कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. हा सर्व प्रकार ठाण्यातील शिवाई नगर शाखेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू होता.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा नेमक्या कुणाच्या? यावरुन आता वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसून येतंय.