पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी; 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन गटामध्ये हाणामारी होऊन दोन्ही बाजूच्या 13 जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदले आहेत. या घटना मौलाली चौक आणि सिद्धार्थ चौक परिसरात रात्री 9 ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली.

    सोलापूर : पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन गटामध्ये हाणामारी होऊन दोन्ही बाजूच्या 13 जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदले आहेत. या घटना मौलाली चौक आणि सिद्धार्थ चौक परिसरात रात्री 9 ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली.

    पहिल्या फिर्यादीत, सोहेल जावेद बागवान (वय २३, मिल्लत मोहल्ला मशिदीजवळ, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, जब्बार बसरी, जुबेद बसरी, फिरोज बसरी, इरफान बसरी, वसीम बसरी, जहीर बसरी, इस्माईल बसरी, अब्दुल्ला बसरी, जयेद शेख यांनी मिल्लत मोहल्ला मशिदीजवळ पूर्वीच्या भांडणाचा रोष मनात ठेऊन फिर्यादी, त्याचा मावस भाऊ आणि वडिलांना हाताने, लाथाबुक्क्याने, लाकडी बांबूने मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार नदाफ तपास करत आहेत.

    तर दुसऱ्या फिर्यादीत मुजमिल अब्दुल जब्बार बसरी (वय 34, मिल्लत मोहल्ला, मौलाली चौक, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिद्धार्थ चौक पाण्याच्या टाकीजवळ अबुसुफिया जावेद बागवान, सोहेल जावेद बागवान, एजाज बागवान, जावेद बागवान यांच्यासह चार ते पाच जणांनी फिर्यादीला पाहून शिवीगाळ करून लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे.