बर्थडे पार्टीतच राडा; दोन गटांमध्ये जुन्या वादातून हाणामारी, शस्त्रेही काढली अन्…

हिंगणा मार्गावरील एका ढाब्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून (Clashes between Two Groups) राडा झाला. दोन्ही गटांमध्ये तूफान हाणामारी होऊन शस्त्रही निघाले. यात चारजण गंभीर जखमी (Four Peoples Injured) झाले.

    नागपूर : हिंगणा मार्गावरील एका ढाब्यावर तरुणांच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून (Clashes between Two Groups) राडा झाला. दोन्ही गटांमध्ये तूफान हाणामारी होऊन शस्त्रही निघाले. यात चारजण गंभीर जखमी (Four Peoples Injured) झाले.

    सागर दत्तू डोंगरे (22), आदित्य ओमकार निघोट (23 दोन्ही रा. सातनवरी), शुभम जोध (26 रा. वानाडोंगरी) आणि करण भीमराव मोहिते (26 रा. हिंगणा) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ऋतिक मधुकर झाडे (22 रा. धामना) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी अभिषेक आमदरे, अल्केश गजभिये, बादल लोणारे, रोहित खंडारे आणि धम्मशील कांबळे (सर्व रा. धामणा) यांचा शोध सुरू केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ऋतिकचा वाढदिवस होता. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास तो त्याचे मित्र सागर, आदित्य, शुभम आणि करण यांच्यासह अमरावती मार्गावरील अमरजीत पंजाबी ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेला होता. समोरच्या टेबलवरच आरोपी अभिषेक आपल्या साथीदारांसह बसलेला होता. त्याचा ऋतिक आणि त्याच्या मित्रांशी जुना वाद आहे. त्याने ऋतिक आणि त्याच्या मित्रांना पाहताच जुना वाद उकरून काढला.

    शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. यावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. काही वेळाने सर्वजण ढाब्यातून बाहेर पडले. यावेळी पुन्हा त्यांच्यात वाद सुरू होऊन हाणामारी सुरू झाली. यादरम्यान अल्केशने चाकू काढले. दोन्ही हातात चाकू घेऊन फिरवण्यास सुरुवात केली.