बीडमध्ये ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटला; शिंदे गटातील ‘या’ महिला नेत्याचा वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप

बीडमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात संघर्ष रंगलाय. ठाकरे गटाचे अंबाजोगाई तालुका युवा प्रमुख अक्षय भुमकर याने सोशल माध्यमावर पोस्ट करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान याच प्रकरणावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जुंपली आहे.

    बीड : बीडमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात संघर्ष रंगलाय. ठाकरे गटाचे अंबाजोगाई तालुका युवा प्रमुख अक्षय भुमकर याने सोशल माध्यमावर पोस्ट करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान याच प्रकरणावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जुंपली आहे.

    अंबाजोगाई तालुका युवा प्रमुख अक्षय भूमकर यांनी ठाकरे गटाचे युवा मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट सोशल माध्यमावर केली. त्यांनतर अंबाजोगाईतील स्वराती रुग्णालयात अक्षय भूमकर यांच्यावर उपचार सुरू होते.

    दरम्यान भूमकर यांची शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. भेट घेतल्यानंतर बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या युवा सेना नेत्या शर्मिला येवले यांनी थेट ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ठाकरे गटाचे युवा मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांनी माञ हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे गटाला बदनाम करण्याचं षडयंत्र शिंदे गटाकडून सुरू असल्याचा आरोप पिंगळे यांनी केलाय. तर भुमकर यांनी देखील आपल्या विधानावरून यूटर्न घेऊन वैयक्तिक कारणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. असा व्हिडिओ वायरल केलाय.