अजित पवारांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या बैठकीत गोंधळ; ओबीसीतून आरक्षण देण्याची समाजाची मागणी

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, याच बैठकीदरम्यान ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

    कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, याच बैठकीदरम्यान ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

    कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अजित पवार यांनी स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत गोंधळ घातला.

    मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करत आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यातच अजित पवार हे कोल्हापुरात येत असल्याने त्यांनी बैठक घेऊन चर्चा करावी, अशी लेखी मागणी करण्यात आली होती. या मागणीवरून ही बैटक पार पडली. याच बैठकीत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.