MLA disqualification
MLA disqualification

Shiv Sena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधान भवनात उपस्थित होते

  Shiv Sena Mla Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आज पुन्हा एकदा सुनावणी नियोजित केली होती. या सुनावणीला आज दुपारी सुरुवात झाली. जवळपास तीन तास आज युक्तिवाद झाले. विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरु झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित होते. कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता.

  यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी अलीकडे घेत 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता घेतली. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे विधासभा अध्यक्षांच्या (Rahul Narwekar) वेळापत्रकात बदल करण्यात आला.

  आमदार अपात्रता सुनावणी LIVE Updates
  आज तीन अर्जवर सुनावणी झाली

  1 अर्ज ज्यामध्ये एकत्र सुनावणी व्हावी
  2 काही अधिकचे कागद पत्रे द्यायचे आहे कागदोपत्री पुरावा रेकॉर्ड वर घ्यावा
  3 त्यांना अॅडीशनल फॅक्टस मुद्दे त्यांना उपस्थित करायचा आहे

  २० तारखेला या तिन्ही अर्जावर निकाल दिला जाईल

  अनिल साखरे शिंदे गटाचे वकील काय म्हणाले?
  आमचा म्हणणं आहे की वेगवेगळ्या याचिका मध्ये वेगवेगळे मुद्दे आहे. आमदारांना मुद्दे मांड्याचे आहे. प्रत्येकाला मुद्दे मांडायला संधी मिळावी. आजचे तिन्ही अर्ज त्यांनी केले. त्यामुळे विलंब होत आहे. आधीच्या याचिकांवर सुनावणी झाली तर लवकर प्रकरण मार्गी लागेल. विलंब त्यांच्यामुळे होत आहे, असं शिंदे गटाचे वकील अनिल साखरे म्हणाले.

  शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने
  शिंदे गटाचे वकील याचिका एकत्र करु नका या भूमिकेवर ठाम
  प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी शिंदे गटाची मागणी
  मात्र याचिका एकत्रच घ्या असा ठाकरे गटाकडून युक्तिवाद
  प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल
  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले मत
  याचिका एकत्र करण्यावर अॅड कामत यांनी केला युक्तिवाद
  याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
  ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी
  याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न
  शिंदे गटाच्या वडिलांकडून याचिकांमधील मुद्द्यांची मांडणी
  तब्बल अडीच तासापासून सुनावणी सुरुच
  आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक कसं आहे?
  आमदार अपात्रतेच्या संदर्भात 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.
  23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
  सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार
  आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
  राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.
  विधानसभा अध्यक्ष सुनावणीनंतर दिल्ली दौऱ्यावर
  आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार असले तरी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधी या प्रकरणावर दिल्लीत कायदेशीर खलबतं होणार असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

  नार्वेकरांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून अॅफिडेव्हिट
  शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या संबंधित वेळापत्रक सादर करावं असंही सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर केलं. पण त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तसेच राहुल नार्वेकरांच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट सादर केलं आहे.