शाळेसमोर स्कूल बसने दहावीच्या विद्यार्थ्याला चिरडले; अपघाताने इतर विद्यार्थ्यांना धक्का

नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटली असता जास्तीत जास्त विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने जाणे-येणे करतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेच्या बसने एका महिला आणि पुरुषाला धडक दिली. त्यानंतर चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरु केले आणि पुढे असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली.

    नागपूर – म्हसाळा या गावात मेरी पाऊसपिन्स शाळेसमोर (Marie Poussepins Academy) स्कूल बसने दिलेल्या धडकेत १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाला. तो दहावी इयत्तेत (SSC) शिकत होता. विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेसमोर हा मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्याना धक्का (Students Shocked) बसला आहे.

    नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटली असता जास्तीत जास्त विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने जाणे-येणे करतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेच्या बसने एका महिला आणि पुरुषाला धडक दिली. त्यानंतर चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरु केले आणि पुढे असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. काही दूरपर्यंत ती व्हॅन (School Van) बसने घासत नेली. दोन मुले पायी जात होती, त्यांनाही बसने धडक दिली. त्यांपैकी एक मुलगा बाजूला फेकला गेला आणि दुसरा मुलगा बसच्या खाली आला.

    सम्यक दिनेश कदंबे (वय १४ वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात येते. त्याच्या डोक्यावरुन बसचे चाक गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात होताच विद्यार्थी जखमी विद्यार्थ्याकडे धावला आणि त्याला पकडले. त्याच्यापाठोपाठ इतर विद्यार्थी आणि चालकही धावले. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. अखेरीत त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.