pravin darekar photo

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण दरेकर (Clean Chit To Pravin Darekar) यांना दिलासा दिला आहे.

    मुंबई: मुंबै बँक घोटाळ्या (Mumbai Bank Scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police ) भाजप नेते प्रवीण दरेकर यांना क्लीनचिट दिली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण दरेकर (Clean Chit To Pravin Darekar) यांना दिलासा दिला आहे.

    मुंबै बँकेच्या अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करुन आणि बनावट कागदपत्रांद्वारे १२३ कोटींचा घोटाळा केल्याचा आहे. आरोप प्रवीण दरेकरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दरेकरांवर आरोप केल्यानंतर सुनावणी सुरू होती. यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे. बँकेने नाबार्डची परवानगी न घेता MPSIDC मध्ये अवैधरित्या ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रिकव्हरी साईटची स्थापना करण्यासाठी बेकायदा निविदा देऊन बँकेचे सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान केलं. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून २७ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात नुकतंच आपलं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात दहा मजूर संस्थांना आरोपी केलं आहे. परंतु प्रवीण दरेकर आणि इतर सहभागाबाबत कुठलेही पुरावे सापडले नसल्याचा उल्लेख करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र सादर केलं असलं तरी न्यायालयाकडून यावर स्वीकारल्याची मोहोर उमटवण्यात आली नसल्याचं समजतं.