pooja chavhan

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचे सांगितले आहे (Clean chit to Sanjay Rathore in Pooja Chavan's suicide case).

    पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचे सांगितले आहे (Clean chit to Sanjay Rathore in Pooja Chavan’s suicide case).

    पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.

    पोहरावदेवीच्या महंतांनी पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज,जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली.

    महंत सुनील महाराज म्हणाले, राठोड हे पोलिसांच्या अहवालानंतर निर्दोष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावे यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे उद्याची वेळ मागितली आहे. त्याप्रमाणे त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करणार आहे.

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे राठोड निर्दोष असल्याने त्यांना पुन्हा मंत्री बनवण्यात भाजपची अडचण जाणवत नाही.