संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) यांत्रिकी विभागाच्या ताफ्यात चार यांत्रिकी झाडू दाखल झाले असून, मंगळवारी (दि. ५) रात्रीपासून शहरातील काही मार्गावर या यांत्रिकी झाडूने साफसफाईला सुरुवात करण्यात आली.

  नाशिक : नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) यांत्रिकी विभागाच्या ताफ्यात चार यांत्रिकी झाडू दाखल झाले असून, मंगळवारी (दि. ५) रात्रीपासून शहरातील काही मार्गावर या यांत्रिकी झाडूने साफसफाईला सुरुवात करण्यात आली.

  सध्या यांत्रिकी झाडूचा उपयोग प्रायोगिक तत्वावर होणार असून, काही दिवसांनंतर त्याला नियमित करण्यात येणार आहे. तरी चार यंत्र एकाच रात्रीत सुमारे १६० किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करणार असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्रीपासून दररोज दहा ते पहाटे ६ वाजेपर्यंत या यांत्रिकी झाडू काम करणार आहे.

  पहिली गाडी एबीपी सर्कलपासून सुरू होऊन सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर या भागात, तर दुसरी एबीपी सर्कल, महात्मानगर, जेहा सर्कल, अशोक स्तंभ या भागात तर तिसरी गाडी पंचवटी भागातील शाही मार्ग, तपोवन आदी भागातील रस्त्यांवर गेली होती. त्याचप्रमाणे एक गाडीने नाशिकरोड भागातील नांदूरनाका ते बिटकोपर्यंत सफाई केली. ऍन कॅप योजनेअंतर्गत यांत्रिकी विभागाने ३३ कोटी रुपये खर्चून चार यांत्रिकी झाडू खरेदी केली आहे.

  एका झाडूसाठी दोन कोटी सहा लाख खर्च

  एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये असा खर्च आला आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरवण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार रुपये खर्च होणार आहेत.

  पाच वर्षांसाठी २१ कोटी रुपये खर्च होईल. एका यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने साडेतीन मीटर रुंदीच्या रस्त्यावर चाळीस किलोमीटरची स्वच्छता केली जाणार आहे. याप्रमाणे चार यांत्रिकी झाडूंच्या सहाय्याने प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.