इंद्रायणी नदी परिसरात स्वच्छता अभियान; स्थानिक नागरिकांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश

कार्तिकी वारी २०२२ निमित्त आळंदी परिसरात इंद्रायणी घाट, महात्मा गांधी स्मारक, भक्त पुंडलिक मंदिर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छतेचा, प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.

    राजगुरुनगर : आळंदी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्न शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने कार्तिकी वारी २०२२ निमित्त आळंदी परिसरात इंद्रायणी घाट, महात्मा गांधी स्मारक, भक्त पुंडलिक मंदिर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छतेचा, प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.

    या प्रसंगी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, मुकादम मालन पाटोळे, स्वच्छता अभियान समन्वयक अर्जुन मेदनकर, इंद्रायणी घाट व्यवस्थापक अभियंता वसंत शिंदे यांचे मार्गदर्शन झाले.

    अभियानात १६० स्वयंसेवकांचा सहभाग

    राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. संजीव कांबळे, प्रा. कैलास अस्तरकर, डॉ. रणजित कदम, डॉ.राजू शिरसकर, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा.सविता मानके, प्रा.यशोदा खुळखुळे प्रा.प्रियंका जाधव उपस्थित होते. या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे १६० स्वयंसेवक व आळंदी नगरपालिकेचे सफाई कामगार सहभागी झाले होते.