
मशीदींच्या भोग्यांच्या समोर हनुमान चालिसा वाजवा असे आदेश त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते यावरूनही महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. या निमित्ताने माझ्या मनसैनिकांवर ज्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या सर्वप्रथम मागे घ्या. असा सज्जड दमही त्यांनी यानिमित्ताने दिला.
मुंबई : मशीदींवरील भोंग्यांच्या (Loud Speakers On mosques) विषयावरही आजच्या शिवतीर्थावरील पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. जेव्हा हा विषय घेतला तेव्हा माझ्या मनसैनिकांवर १७,००० गुन्हे (Cases) दाखल करण्यात आले. जर तुम्हाला जमत असेल तर ठीक नाहीतर आम्ही जे करत आहोत त्याकडे दुर्लक्ष करा अशा ठाकरी शैलीत त्यांना राज्य सरकारला सूचक इशाराही दिला आहे.
मशीदींच्या भोग्यांच्या समोर हनुमान चालिसा वाजवा असे आदेश त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते यावरूनही महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. या निमित्ताने माझ्या मनसैनिकांवर ज्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्या सर्वप्रथम मागे घ्या. असा सज्जड दमही त्यांनी यानिमित्ताने दिला.
मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल.
मध्यंतरी एक पत्र आलं, सांगली,कुपवाड येथून पत्र आलं. इथल्या रहिवाश्यांनी लिहिलं आहे,’हा भाग हिंदुबहुल आहे. इथल्या एका मोकळ्या जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण केलं, आम्ही विरोध केला तर आम्हाला धमक्या दिल्या, त्रास दिला, ह्यावर पोलिसांनी दखल घेतली नाही; तिथे मशीद बांधली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची पसरलेली कबर पुन्हा जागेवर आणली. ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन. एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या आणि एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू.
सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते आता बघूया… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?
माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल.
देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही.
माझी तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. येत्या ६ जून २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वतः रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या. आणि हिंदू बांधवांना विनंती आहे की, ‘दक्ष रहा.’