sinnar flood

सिन्नर शहरासह (Flood In Sinnar) तालुक्यात १ सप्टेंबर २००२ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शहरासह तालुक्यात पाणीच पाणी करून टाकले. शहरातील देवी रोड, जुना पूल, अशा शहरातील अनेक भागात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

    नाशिक : सिन्नर तालुक्यामध्ये (Flood In Sinnar) ढगफुटी सदृश्य पाऊस (Cloud Burst In Sinnar) झाला आहे. या पावसामुळे सिन्नर शहरासह तालुक्यात पाणीच पाणी दिसत आहे. (Flood News) शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे तर तालुक्यातील नद्या नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली.

    सिन्नर शहरासह तालुक्यात १ सप्टेंबर २००२ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शहरासह तालुक्यात पाणीच पाणी करून टाकले. शहरातील देवी रोड, जुना पूल, अशा शहरातील अनेक भागात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. सरस्वती नदी शेजारी असलेल्या कुटुंबांना स्थानिक नागरिकांनी तसेच पोलीस कर्मचारी नगरपालिका यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढले  सिन्नर नागरिक एकमेकांच्या सहकार्य करत रस्त्यावर उतरलेले आहेत.

    जेसीबीच्या मदतीने अनेक कुटुंबांतील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पुराच्या पाण्यात उतरत पाण्याने वेढलेल्या घरांमधून वीस ते पंचवीस जणांचे रेस्क्यू ऑपरेशन करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तालुक्यातील मनेगाव येथील धोंडीवीरनगर येथे देखील मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आल्याने अनेक गाव व वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

    देवपूर-मनमोडा सिन्नर रस्त्यावरील देवनदी पूल हा स्मशानभूमीच्या बाजूने वाहून गेला. या पुराच्या पाण्यामध्ये डंपरदेखील वाहून चालला असता एका ठिकाणी अडकला आहे. नागरिकांनी या रस्त्यावर ये जा करू नये व पुलाजवळ कोणी जाऊ नये, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.